http://beta.esakal.com/2009/06/26220605/pune-women-patients-increasing.html
--~--~---------~--~----~------------~-------~--~----~
To post to this group, send email to siff_pune@googlegroups.com
To unsubscribe from this group, send email to
siff_pune-unsubscribe@googlegroups.com
-~----------~----~----~----~------~----~------~--~---
महिलाही पडताहेत व्यसनांच्या बळी (व्हिडिओ स्टोरी)
वैशाली भुते
Friday, June 26th, 2009 AT 10:06 PM
मुक्तांगणच्या उपसंचालिका मुक्ता पुणतांबेकर
पुणे - महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करावा लागणं, हेच महिलांमधील व्यसनाधीनता वाढल्याचं निदर्शक. व्यसनमुक्तीसाठी येणाऱ्या महिलांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्रानं नुकताच महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू केला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
याबाबत मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, की २३ वर्षांपूर्वी जेव्हा मुक्तांगण सुरू झालं, तेव्हापासून आतापर्यंत केवळ पुरुषच व्यसनमुक्तीसाठी येत असत. गेल्या दोन- तीन वर्षांत मात्र, मुक्तांगणच्या बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेण्यासाठी महिलाही येऊ लागल्या. मधल्या काळात त्याचं प्रमाण इतकं वाढलं, की आम्हाला महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करावा लागला. सध्या येथे १५ महिला उपचार घेत आहेत.
मुक्तांगणच्या बाह्यरुग्ण सेवा आणि आंतर्रुग्ण सेवेचा लाभ घेणाऱ्या एकूण महिलांमध्ये एनआरआय महिलांचे प्रमाण मोठे असल्याचेही आढळून आले आहे. त्याचबरोबर मध्यमवयीन महिला आणि त्यापाठोपाठ आयटी प्रोफेशनल तसेच कॉल सेंटर्समध्ये काम करणाऱ्या तरुण मुली व्यसनांच्या आहारी गेल्याचेही दिसून आले आहे.
घरातील जबाबदाऱ्या संपल्यामुळे, मुले स्वतंत्र झाल्याने आणि पती कामाच्या व्यापामुळे वेळ देऊ शकत नसल्याने एकट्या पडलेल्या महिला व्यसनाच्या आहारी जातात. नैराश्यामुळे झोपेच्या गोळ्या, दारू आदी व्यसन त्यांना लागतात. तर, तरुणींच्याबाबत नेमके उलटे चित्र पहायला मिळते. त्यामध्ये या मुलींमध्ये कमी वयात भरपूर पैसा आलेला असतो. त्याबरोबर शनिवार, रविवार अशी जोडून सुट्टी मिळते. आठवड्याचे पाच दिवस जीवतोड काम केल्यानंतर विकएंड जंगी पद्धतीने सेलिब्रेट करण्याची यांची वृत्ती असते. शिवाय रिलॅक्सेशनही हवेच असते. त्यामुळे दारू पिण्याकडे यांचा कल असतो. त्यातून पुढे व्यसन जडते.
पार्ट्या, घरातील मोकळं वातावरण यामुळेदेखील महिलांना व्यसन लागत असल्याचे निरीक्षण मुक्ता यांनी नोंदविले.
याबाबत मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, की २३ वर्षांपूर्वी जेव्हा मुक्तांगण सुरू झालं, तेव्हापासून आतापर्यंत केवळ पुरुषच व्यसनमुक्तीसाठी येत असत. गेल्या दोन- तीन वर्षांत मात्र, मुक्तांगणच्या बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेण्यासाठी महिलाही येऊ लागल्या. मधल्या काळात त्याचं प्रमाण इतकं वाढलं, की आम्हाला महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करावा लागला. सध्या येथे १५ महिला उपचार घेत आहेत.
मुक्तांगणच्या बाह्यरुग्ण सेवा आणि आंतर्रुग्ण सेवेचा लाभ घेणाऱ्या एकूण महिलांमध्ये एनआरआय महिलांचे प्रमाण मोठे असल्याचेही आढळून आले आहे. त्याचबरोबर मध्यमवयीन महिला आणि त्यापाठोपाठ आयटी प्रोफेशनल तसेच कॉल सेंटर्समध्ये काम करणाऱ्या तरुण मुली व्यसनांच्या आहारी गेल्याचेही दिसून आले आहे.
घरातील जबाबदाऱ्या संपल्यामुळे, मुले स्वतंत्र झाल्याने आणि पती कामाच्या व्यापामुळे वेळ देऊ शकत नसल्याने एकट्या पडलेल्या महिला व्यसनाच्या आहारी जातात. नैराश्यामुळे झोपेच्या गोळ्या, दारू आदी व्यसन त्यांना लागतात. तर, तरुणींच्याबाबत नेमके उलटे चित्र पहायला मिळते. त्यामध्ये या मुलींमध्ये कमी वयात भरपूर पैसा आलेला असतो. त्याबरोबर शनिवार, रविवार अशी जोडून सुट्टी मिळते. आठवड्याचे पाच दिवस जीवतोड काम केल्यानंतर विकएंड जंगी पद्धतीने सेलिब्रेट करण्याची यांची वृत्ती असते. शिवाय रिलॅक्सेशनही हवेच असते. त्यामुळे दारू पिण्याकडे यांचा कल असतो. त्यातून पुढे व्यसन जडते.
पार्ट्या, घरातील मोकळं वातावरण यामुळेदेखील महिलांना व्यसन लागत असल्याचे निरीक्षण मुक्ता यांनी नोंदविले.
--~--~---------~--~----~------------~-------~--~----~
To post to this group, send email to siff_pune@googlegroups.com
To unsubscribe from this group, send email to
siff_pune-unsubscribe@googlegroups.com
-~----------~----~----~----~------~----~------~--~---
No comments:
Post a Comment