|
* भारतीय स्त्रीशी लग्न करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा
हुंड्यासाठी पत्नीचा अथवा सुनेचा छळ करणा-या पतीला किंवा त्याच्या कुटुंबीयांना तीन वर्षे कोठडीत टाकण्याचा अधिकार देणा-या ' ४९८ अ ' या कायद्याची दहशत अमेरिका आणि कॅनडालाही वाटते आहे . आपल्या नागरिकांनी भारतीय महिलेशी विवाह करताना सावधानता बाळगावी ; कारण भारतात ' ४९८ अ ' या कायद्याचा दुरुपयोग होतो आहे , अशी धोक्याची सूचना दोन्ही देशांनी आपल्या ' ट्रॅव्हल अॅडव्हायझरी ' मध्ये दिली आहे .
भारतीय महिलेशी विवाह करण्यासाठी भारतात येणाऱ्या अमेरिकी नागरिकांना ४९८ अ या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आल्याच्या अनेक घटना निदर्शनास आल्या आहेत . अशा प्रकरणांत आरोप असलेल्या अमेरिकी नागरिकास खटला काढून घेण्यासाठी पत्नीस मोठी रक्कम देण्याचा आदेश कोर्टाकडून दिला जातो . सामान्यत : आरोपीचा पासपोर्ट कोर्टाकडून जप्त करण्यात येतो आणि केस संपेपर्यंत त्याला भारतातच राहावे लागते , असे या अॅडव्हायझरीत सांगण्यात आले आहे . व्यक्तिगत मतभेदांना गुन्ह्याचे स्वरूप देण्यासाठी न्यायव्यवस्थेचा गैरवापर करण्याचे प्रकार भारतात सातत्याने घडतात . गुन्हा नोंदविण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीस अटक करण्याचा अधिकार पोलीसांना आहे . अमेरिकी नागरिकांचे नाराज व्यावसायिक भागीदार , कॉन्ट्रॅक्टर , पत्नी अथवा अन्य व्यक्तीशी असलेल्या मतभेदांची परिणती बहुतेक वेळा तुरुंगात होते . यामुळे भारतातून पुन्हा अमेरिकेत वेळेवर परतणे शक्य होत नाही ; अकारण वास्तव्य वाढवावे लागते , असे अॅडव्हायझरीत नमूद करण्यात आले आहे . भारतात स्थानिक पातळीवर होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दलही अॅडव्हायझरीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे .
---
अमेरिकी तज्ज्ञांच्या सूचना
- वधू - वरांनी त्यांनी अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांना दिलेल्या अथवा मिळालेल्या गिफ्ट्सची नोंद ठेवावी .
- भारतात प्रवास करताना पासपोर्ट , व्हिसा आणि क्रेडिट कार्डच्या प्रती काढाव्यात . या प्रती विश्वासार्ह मित्र अथवा नातेवाइकांजवळ ठेवाव्यात .
- तिकीट किंवा पासपोर्ट कोणाकडेही देऊ नये .
- ब्लँक चेकवर सही करू नये .
- विवाहापूवीर् कराराचा विचार करावा .
- बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवावे .
- कोणताही प्रिंट - आउट अथवा ई - मेल जपून ठेवावा . भारताच्या सायबर कायद्यानुसार ई - मेल पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो .
- भारतात आल्यावर स्थानिक फॉरेनर्स रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये नावनोंदणी करावी आणि परत जाण्याची तारीख नोंदवावी .
कायद्याच्या गैरवापराची ढोबळ कारणे
- विवाहपूर्व संबंध
- विवाहबाह्य संबंध
- पती , पतीचे कुटुंबीय यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची इच्छा
- अपत्याची कस्टडी
- मुलीची शैक्षणिक अथवा मानसिक आरोग्याविषयक खरी माहिती दडवून ठेवून फसवणुकीने विवाह
Source : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7422208.cms
No comments:
Post a Comment