March 12, 2011

नासलेले शिक्षण मिळालेली स्त्री कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण समाजाचा नाश करते.


सर्व
सामान्य स्त्री / अविवाहित स्त्रीस असलेले गैरसमज.
सरते शेवटी प्रत्येक गैरसमजा ची उत्तरे.

=======================================================

संशय तर तिच्या पाचवीला पुजलाय. नाकासमोर चालायचं .
मोठ्याने हसायचं नाही . पाहुणे आले कि होल मध्ये यायचं नाही .
कपडे नीट घालायचे . कोणाशी जास्त बोलायचं नाही .
रात्री लवकर घरात यायचं . एखादे अपत्य तिच्या झोळीत टाकले कि पुन्हा तिला पत्करणार कोण ? मी मात्र सगळ्या जबाबदार्या झिडकारून दुसरी आणू शकतो .
ती ह्या धक्याने वेडी झाली , मेली तरी मला काय त्याचे .
हाच हाच पुरुषी दृष्टीकोन .
आजही आहे .
ताडन के अधिकारी मधली सर्वात पहिली .
झुगारते मी हि बंधने . मला मोकळी हवा घ्यायचीय .
मी देखील माणूस आहे .
हा दर्जा मिळेपर्यंत तरी येथे काही घडले नाही , घडणार नाही .

तुमचा जन्म माझ्यापासून
तुमचे पालनकर्ती मी .
तुम्हीच मला सर्वात जवळून पाहिलेय हो .
मग आता का असे वखवखल्या सारखे करता ?
आदर करा असे नाही म्हणत
कारण मला माहित आहे जुगारात पैशासारखे मला वापरणारे तुम्हीच आहात .
तुम्हीच दुसर्याचे ऐकून मला वनवासात पाठविले .
अग्निपरीक्षा देवून झालीय माझी . तुम्हाला त्याचे काहीच नाही का ?

तिला काय विचारायचं ? तिला काय अक्कल ? तिला काय कळणार ? हाच हाच तुमचा दृष्टीकोन आजही आहे .
हत्या फक्त आमच्या .
मुलगा झाला म्हणून कोणी त्याची हत्या केलीय ?
कितीही मारा कितीही झोडा. कितीही हत्या करा आमच्या .
पण फिनिक्स पक्षा प्रमाणे आम्ही पुन्हा पुन्हा राखेतून वर येऊ .
गरज आहे तुमच्यात फरक पडण्याचा ,
ते व्हायला अजून युगे जावी लागतील .
जमले तर एक करा .
क्वचित कधी निदान मनापासून आम्हाला माणसाचा दर्जा द्या .
स्वताला कधी तरी आमच्या भूमिकेत घालून बघा .
खूप वेदना सहन करतो आम्ही तुमच्या साठी .
तुम्ही आमचाच नाश करायला निघालात ?
थोडे उदार व्हा . एकच प्रार्थना

=======================================================

नासलेले शिक्षण मिळालेली स्त्री कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण समाजाचा नाश करते.
=======================================================



संशय तर तिच्या पाचवीला पुजलाय. नाकासमोर चालायचं .
>>>>> मुलान वर संशय नसतो का ? तो काय करतो ? वाईट मार्गला तर नाही ना लागला ? कोठे लफडे तर नाही ना ? घरी थोडे उशिरा आले तर बायकोचे वागणे, तिचे ते कपडे , खिसे चाचपडणे ? नाकासमोर चालयचे. का ?

मोठ्याने हसायचं नाही . पाहुणे आले कि होल मध्ये यायचं नाही.
>>>>> मुले हसतात का मोठयाने ? योग्य ठिकाणी तर सगळेच हसतात की मोठ्यांनी तेथे लिंगभेद कोठेच दिसत नाही. महिला-पाहुणे आले तर मुले त्यांचा बरोबर बसतात का ? बरे सांगा, वाईट नजरची तक्रार कोण करते ?

कपडे नीट घालायचे . कोणाशी जास्त बोलायचं नाही .
>>>>> कपडे नीट घालणे ही सुज्ञ नागरिकाची जबाबदारी आहे. पुरुष पण नीट कपडे घालतोच की, अनोळखी व्यक्ति कडून चॉकलेट घेऊ नये , ह्याचे धडे आपले पालक तर लहानपणीच देतात. तुमची विचार सरणी अशी का दुर्गंदी युक्ति झाली आहे. जबाबदारी घेतली नाही तर प्रत्येक छोटी गोष्ट बळजबरीच वाटते.

रात्री लवकर घरात यायचं .
>>>>> आपल्या जवळ असलेल्या मोल्यावण वस्तू सांभाळण्याची जबाबदारी आपलीच ना? की लुटायला आलेल्या गुंडाची? स्त्रीला समाज्यात वावरण्यास पोलिसांचे संरक्षण हवे. पण मग स्त्री का भरती होत नाही पोलीस मध्ये , रात्रीच्या ग्रस्ती त्यांनी पण घालाव्या. पुरुष-पोलीसांनीच का म्हणून रात्रीच्या गुंडांचा सामना करावा. त्यांना पण परिवार आहे त्याना पण चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे. बरे रात्री अपरात्री फिरणाऱ्या ह्या पोरी कोण ? आणि का फिरतात रात्री. सभ्य घरात तर रात्री , मुले सुधा घरात असतात एकत्रित जेवणासाठी. बरे मुले रात्री बाहेत फिरली तर त्यांना पण गुंडाचा तेवढाच धोका असतो. मुले करतात का वाढीव पोलीस संरक्षणची मागणी.

एखादे अपत्य तिच्या झोळीत टाकले कि पुन्हा तिला पत्करणार कोण ? मी मात्र सगळ्या जबाबदार्या झिडकारून दुसरी आणू शकतो .
>>>>> हुम्म.... आता मुले ही आनंदाची बाब नाही तर ते ओझे झाले आहे का? मुले तर सोडयची नाही कारण त्यामुळे नवर्या कडून महिन्याला खवटी मिळते. मुले द्या नवर्याला आणि खुशाल करा दुसरे लग्न. आणि हो महत्त्वाचे, “पत्करणारआणिआणूविशेयी :: स्त्री/मुली ने कोणी पत्करण्याची वाट पाहू नये. तिने दूसरा काय तिसरा पण आणावा पण तिच्या स्वत:च्या घरात. आत्या बिळावर नागिन होऊ नये ;) , कमी शिकलेला किव्हा कमी कमविणारा शोधावा. लोभ करू नये. स्वावलंभी बनावे.

ती ह्या धक्याने वेडी झाली , मेली तरी मला काय त्याचे .
>>>>> मुलींचा एका “Hi” ला शेकडो प्रतिक्रिया येतात. तेव्हा हा गैर-समज किती ठेवायचा. प्रत्येक नऊ मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करतो आहे भारतात, आपणास माहीत आहे का ? (LINK) व्रत पत्र का दाखवीत नाही अशा बातम्या ?

हाच हाच पुरुषी दृष्टीकोन .
आजही आहे .
>>>>> हो आजही पुरुष आसाच बळीचा बकरा बनत आहे.

ताडन के अधिकारी मधली सर्वात पहिली .
झुगारते मी हि बंधने . मला मोकळी हवा घ्यायचीय .
मी देखील माणूस आहे .
>>>>> हो पुरुष देखील माणूस आहे.

हा दर्जा मिळेपर्यंत तरी येथे काही घडले नाही , घडणार नाही .
>>>>> पुरुष पण तेच म्हणतो आहे.

तुमचा जन्म माझ्यापासून , तुमचे पालनकर्ती मी .
>>>>> काय ? पुरुष फक्त स्पर्म दान करणारा असतो का ? तुम्ही तुमच्या पालन कर्ता(वडील, भाऊ, पती, मुलगा) ला का विसरता ? पुरुषा विशेयी असलेला आसुरी राग सोडा. थोडे मोकळा , निप्क्ष्पती विचार करा.

तुम्हीच मला सर्वात जवळून पाहिलेय हो .
>>>>> वडील तर जोखमीचे काम करण्यास, पैसे कमविण्यात मूला पासून थोडे दूर असतो तर तुम्ही त्याचा गैर फायदा घेता का ?

मग आता का असे वखवखल्या सारखे करता ?
>>>>> समाजात किती कष्ट करावे लागते हे कळल्या वर तुम्ही असे माजलेले प्रेश्न नाही विचारणार. कष्ट करून बघा.

आदर करा असे नाही म्हणत
>>>>> पुरुष देखील तेच म्हणतो आहे. ;)

कारण मला माहित आहे जुगारात पैशासारखे मला वापरणारे तुम्हीच आहात .
>>>>> हे नेहमीचेच आहे. स्त्री ही नेहमी आरामात राहणे पसंत करते. जोखीम पुरुषावर ढकलते. पुरुषाला दोष देऊन काष्टा पासून दूर पाळायचे. कष्ट फक्त पुरुषाने करायचे. कुटुंबावर काही संकट आले तर स्त्री ने त्याचा भाग का उचलू नये ? पुरुषाने स्वत:ला विकावे(हो, सर्व पांडव स्वत:ला विकून बसले होते नंतर कोठे तर तिचा विचार पुढे करण्यात आला), प्रसंगी जीव पण द्यावा. मोबदल्यात पुरुषाला काय मिळाले तर स्त्री आणि समाजाकडून थू थू ! “आंधळ्या आई-बापचा मुलगा आंधळाम्हणणारी व्यक्ति कोण ?

तुम्हीच दुसर्याचे ऐकून मला वनवासात पाठविले .
>>>>> सोन्याचा मोह कोणाला झाला तो पूर्ण करण्याची जबाबदारी कोणी घेतली ? वाहिनी(सीता) चे अश्लील टोमणे का सहन करायचे पुरुषाने(लक्ष्मणने) ? रेषा का ओलांड्याची ? मग पुरुषाला दोष देयचा का ? स्त्री केव्हा जबाबदारी घेण्यास शिकणार ?
तुम्हाला तुमचा राजा, राज्य-करता, नेता कसा पाहिजे? कलमाडी, . राजा, मनमोहन, चव्हाण , सोनिया-गांधी सारखे भष्ट नेते पाहिजे का ? जनतेचे मानसिक, शाररिक, आर्थिक सोशण करणायरे नेते पाहिजे का ? की जनतेचे सगळे गैरसमज, आचारणा द्वारे(आश्वाषणा द्वारे नाही) दूर करणारे? कोणताही निर्णय घेतला तरी तो पुरुषाला दुखच देणारा असतो. का पुरुषणेच का घेयाचे असे निर्णय ? स्त्रीला थोडा त्रास झाला तर का टाहो फोडतात. स्त्रीची(राणी, नेत्याची पत्नी) काही जबाबदारी असते का, कुटुंबात आणि समाजात ? स्त्री केव्हा जबाबदारी घेण्यास शिकणार ?

अग्निपरीक्षा देवून झालीय माझी . तुम्हाला त्याचे काहीच नाही का ?
>>>>> पुरुष दररोज जोखमीचे कामे करून अग्निपरीक्षच देत असतात. पर पुरुषाशी/स्त्रीशि असलेल्या संबधा विषयी स्पटीकरण समाजा समोर देणे म्हणजे अग्निपरीक्षा असतेच की. कोणताही निर्णय घेतला तरी तो दुखच देणारा असतो पुरुषाला, ही अग्निपरीक्षा नाही का ? तो निर्णय पाळणे अग्निपरीक्षा नाही का ?

तिला काय विचारायचं ? तिला काय अक्कल ? तिला काय कळणार ? हाच हाच तुमचा दृष्टीकोन आजही आहे.
>>>>> कष्ट करून ज्ञान मिळवा. ज्ञानाला लिंग नसते. ज्ञानि पुरुष-स्त्री ला सगळेच सलाम करतात.

हत्या फक्त आमच्या .
>>>>> स्त्रीची हत्या करण्यास स्त्रीच पुढे आहे. मग पुरुषाला का दोष देयचा ? वयाच्या वर्गीकर्ण नुसार पुरुष-स्त्री चे प्रमाण माहीत आहे का आपणास. पुरुषाचे सरासरी आयुष 55 आहे. स्त्री पेक्षा 10 वर्ष कमी. बरेच पुरुष का जगत नाही पूर्ण आयुष? त्या बद्दल कोणी काहीच का बोलत नाही ?

मुलगा झाला म्हणून कोणी त्याची हत्या केलीय ?
>>>>> जोखमीचे कामे पुरुच करतात. जगातील कोणतीपण लढाई घ्या, त्यात पुरुषाचे प्रमाण खूपच जास्त आहे. अमेरिकेतील लढाई असो नाही तर तालीबानची, पुरुषचं का मरतात ? कोणी बोलते का ह्या मोठया हत्या बद्दल. घरातील गॅस सिलेंडर बदलण्याचे किव्हा इलेक्ट्रिक चे काम असो. जोखमीची कामे पुरुषच का करतात ? मरणं नंतरपण पुरुषणेच पोसावे स्त्रीला (Insurance).

कितीही मारा कितीही झोडा. कितीही हत्या करा आमच्या .
>>>>> पुरुष पण तेच म्हणतो आहे.

पण फिनिक्स पक्षा प्रमाणे आम्ही पुन्हा पुन्हा राखेतून वर येऊ .
>>>>> फिनिक्स पक्षाने पुरुषा कडून शिकले आहे कसे राखेतून उभे रहाचे ते. ;)

गरज आहे तुमच्यात फरक पडण्याचा ,
ते व्हायला अजून युगे जावी लागतील .
>>>>> पुरुष पण तेच म्हणतो आहे.

जमले तर एक करा .
>>>>> जमले तर नाही , हे कराच,

क्वचित कधी निदान मनापासून आम्हाला माणसाचा दर्जा द्या .
>>>>> पुरुष पण तेच म्हणतो आहे.

स्वताला कधी तरी आमच्या भूमिकेत घालून बघा .
>>>>> पुरुष पण तेच म्हणतो आहे.

खूप वेदना सहन करतो आम्ही तुमच्या साठी .
>>>>> पुरुष पण तेच म्हणतो आहे. प्रसंगी जीव पण देतो.

तुम्ही आमचाच नाश करायला निघालात ?
>>>>> पुरुष पण तेच म्हणतो आहे.

थोडे उदार व्हा . एकच प्रार्थना
>>>>> पुरुष पण तेच म्हणतो आहे.




-- सिफ पुणे.

No comments: