'महिलांच्या सर्वांगीण प्रगतीतच देशविकास'
फक्त महिलांना आरक्षण देणे म्हणजे महिलांची प्रगती होते का?
फक्त महिलांना पोटगी दिल्याने म्हणजे महिलांची प्रगती होईल का?
फक्त महिलांना पोटगी दिल्याने म्हणजे महिलांची प्रगती होईल का?
काम न करता आयतं बसून महिलांचा विकास होऊ शकतो का?
देशाचा विकासाची स्वप्ने पाहातांना स्त्रियांची भूमिका महत्वाची, परंतु त्यांना स्वंयरोजगार किंवा काम करण्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सरकार मनोभावे देते का?
महिला सशक्तिकरण याचा अर्थ केवळ पुरुषांचा पैसा बळकविण्यापुरता मर्यादित असावा का?
महिला सशक्तिकरण याचा अर्थ केवळ पुरुषांचा पैसा बळकविण्यापुरता मर्यादित असावा का?
महिला सशक्तिकरण व महिला सबळीकरण यासाठी केले जाणारे कायदे यांनी पुरूषांचे मूलभूत हक्कांवर गदा आणणे व त्यांचे संरक्षण बंद करणे येवढेच का?
महिलांसंरक्षण कायदे हे फक्त वकिलांचा धंदा वाढविणारे अस्त्र होय.
महिलांसंरक्षण कायदे हे फक्त वकिलांचा धंदा वाढविणारे अस्त्र होय.
महिला सशक्तिकरण व महिला सबळीकरण धोरण हे समाजाच्या इतर वर्गाला त्रास होणार नाही, देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, आपल्या परिवाराला व देशाच्या भावी पिढीला सकारात्मक व सशक्त बनवेल ह्या दृष्टीने वाटचाल केली पाहीजे.आरक्षण देऊन होतकरू व योग्य महिलांवर अन्याय होत आहे याकडे ही लक्ष दिले पाहिजे.
महत्त्वाच्या व सत्तेच्या स्थानांवर आरक्षण दिलेल्या बुजगावण्यांना उभे कले तर आपण देशोधडीला लागू. योग्य ठिकाणी योग्य माणसांचे असणे फार गरजेचे आहे.
इंदिरा गांधी, प्रतीभा पाटील, उमा भारती, सुषमा स्वराज, ममता बॅनर्जी ह्या महिला आरक्षण मुळे आपल्या स्थानावर आलेल्या नाहीत. त्यांना नेते बनविण्यापासून कोणी रोखलेही नाही, त्यांनी स्वहस्ते यश मिळविले आहे.
आपली योग्यता सिद्ध करून महिलांना कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी काम करण्यास कोणीही रोखत नाही मग आरक्षण फक्त लोकसभेत, राज्य सभेत, ग्राम पंचायत आणि राजकारणात का?
राजकारणी पार्ट्यांना महिलांना नेतेपद देण्यापासून कोणी रोखते का?
प्रत्येक पार्टीने निवडणूकीच्या वेळी ५०% तिकीटे महिलांसठी जाहीर करावी. तसे ते करतील का ?
आज महिलांना पुरुषांबरोबरच शिक्षण मिळते. एकाच शाळेत ते शिकतात. परंतु पैसा कमविण्याचे काम पुरुषांचे का?
आजही ८२% करदाता हे पुरुष आहेत. आपल्याकडे पशू मंत्रालय आहे परंतु पुरुषांकडून प्राप्त केलेल्या ह्या पैशांचे पुरुष उद्धारासाठी एक पै ही सरकार खर्च करत नाही. पुरुषांसाठी एक वेगळे मंत्रालय स्थापित व्हावे.
जास्तीत जास्त महिलांना सबळ करण्याकरीता आरक्षण धोरण फक्त तळागाळाला असणार्या स्त्रिय़ांना मिळाले पाहिजे.
ह्याच त्या स्त्रियां आहेत जे खरोखरच देशाच्या प्रगतीस कारणीभूत ठरतील.
-- सिफ पुणे