पुरुषांचे शाररीक आणि मानसिक खच्चिकरण.
समाजाने अतिशय नियोजित पध्दतिने चालवलेले, पुरुषांचे खच्चिकरण आपणास माहित आहे का ?
हो.. हो.. पुरुषांचे खच्चिकरण. हसू आले?
पुरुषांच्या वेदनांवर "हसणे" हि पुर्वापार चालत आलेली "समाज सेवा" आहे.
"हसणे" हि प्रतिक्रिया खुपच क्वामन आहे. विशेष: "पुरुषाचे हसणे", स्त्री बऱ्या पैकी जागरुक आहे, तीच्या हक्का बद्दल व पुरुषांचे चाललेले शोषणा बद्दल. त्यामुळे ती शकतो हसणार नाही. तीला त्याची जाणिव आहे. परंतु बऱ्याच पुरुषां माहीतच नाही, त्यांना काही हक्क आहे. त्यांचे कोणी शोषण करत आहे.
पुरुषांचे खच्चिकरण, सर्वसामान्यांना समजणे ही एक जटिल प्रक्ररीया आहे.
मुलत: हे सत्य नेहमीच दडलेले, उपेक्षित राहिले आहे. वर्षांनुवर्ष पुरुषांनी ते मुकाटपणे सहन केले आहे. वेळोवेळी कोणी खोटी स्तुती करुन तर कोणी जबाबदारीची जाणिव करुन त्या कडे राजरोस दुर्लक्ष केले आहे.
महाभारतातील शंतनू असो ,
रामयाणातील राम - श्रावणबाळ असो
किंव्हा आजचा तरुण असो.
पुरुषांचे शोषण निरंतर चालूच आहे.
झोपलेले पुरुष ते मुकाट पणे जगत, सोसत आहे.
पुरुषांच्या त्रासाबद्दल चर्च्या करणे हे "स्त्रीमुक्ति" विरोधी, बक्कवास, वेडपट, माजलेले, जनहित विरोधी, बेजबाबदार मानले आणि समजले जाते. आणि ते टाळले पाहिजे असा समज आहे. बऱ्याच वेळेस तर नपुंसकतेचा, समलैंगिकतेचे शेरे ही मारले जाते. दुभाग्याची बाब म्हणजे असे शेरे मारण्यात पुरुषच पुढे आहे.
मग स्त्री का माघे राहणार ? राखी सावंत चांस मिळताच शेरे मारणार. त्यानंतर "त्या पुरुषाने" आत्महत्या केली तरी, शण्ड मेडिया गप्प बसणार.
http://www.allvoices.com/contributed-news/7311548-rakhi-sawant-drives-a-24-year-old-man-to-commit-suicide/blogs
http://www.allvoices.com/contributed-news/7311548-rakhi-sawant-drives-a-24-year-old-man-to-commit-suicide/blogs
पुरुषाचे खच्चिकरण इतके जटिल आहे की ते पुरुषाला पण पटकन कळत नाही. इतके हे शोषण अंगवळणी झाले आहे.
कितीही त्रास झाला तरी स्त्रीचे( बायको, आई, बहीण, मुलगी) व कुटुंबाचे संरक्षण करणे. कोणतीही मदत माघायची नाही. कोणालाही, होत असलेला त्रास सांगायचा नाही. सांगितले तर तो तुमचा कमी पणा म्हणून समाजाने दुर्लक्ष करयाचे.
हा कोठला ऩ्याय ?
आर्थिक, सामाजिक, शाररिक, मानसिक सर्व प्रकारचे संरक्षण पुरुषाने द्यावे स्त्रीला व कुटुंबाला.
पण पुरुषाला कोण देणार आधार ?
समाजाचे पुरुषावर असलेले दबावतंत्र असे आहे,
१) पुरुषाने भावनिक असू नये. असल्यास ते व्यक्त न करता सहन करावे.
२) पुरुषाने कधीही रडू नये. तो अधिकार फक्त स्त्रीला.
३) ते शाररिक द्रुष्ट्या, रफ अन्ड टफ असलेच पाहिजे. आजकाल तर ते गोरे असावे असा पण दबाव आहे.
४) स्त्री बद्दल तर कधी तक्रार करुच नये.
५) कुटुंबाचे "संरक्षण" आणि "गरजापुर्ण" करणे हे पुरुषांचे प्रथम आणि आद्य कर्तव्य आहे.
६) पुरुषाने त्यांच्या कर्तव्यासाठी सर्व त्याग करावा. (राम, श्रावणबाळ, शंतनू) वेळे प्रसंगी प्राण ही द्यावे. नाराज लोकांची बोलणी पण निमुटपणे ऎकाव्या, त्या मोबद्ल्यात काही अपेक्षा ठेवणे म्हणजे कमीपणा आहे.
७) पुरुषानी सर्वच कठिण प्रसंगानचा सामना करावा. त्यात माघार घेऊ नये.
८) जोखमीचे, शाररिक कष्टाचे सगळी कामे पुरुषानेच करावे.
९) पुरुषाने स्त्रीला गिफ्ट्स द्यावे.
१०) पुरुषाने, स्त्रीला जे योग्य वाटेल तेच करावे.
११) पुरुषाने, स्त्रीचा आदर करावा. कारण तीचे लिंग "ते" आहे म्हणून.
१२) पत्निने आत्महत्या केली तर ती हुंडाबळी, पतीने आत्मह्त्या केली तर बेजबाबदार, कमजोर, नामर्द पती.
१३) पत्निने पतीला सोडले तर ते योग्य डिशिजन, पतिने सोडले तर अत्याचारी पति.
१४) पत्निने पति चा खुन केला तर स्त्री शक्ति, पतिने खुन केला तर वाढता स्त्री-अत्याचार.
१५) करिअर साठी केलेला गर्भपात आधुनिक प्रगत स्त्री, पुरुषाने (शंतनू) विरोध करु नये, गप्प बसावे.
१६) घरातील छोटे भांडण फक्त स्त्री करते, पुरुष करतो ते कौंटुंबिक (डोमेसटिक) अत्याचार.
१८) प्रणय चा पुरुषाने केलेला नकार म्हणजे "स्त्री अत्याचार". स्त्री ची गरज न भागवणे म्हणून.
१९) पिक्चर फिल्म मध्ये दाखवल्या प्रमाणे, पुरुषाने स्त्रीच्या माघे राहावे, तिचे मन जिंकण्याचा नेहमी प्रयत्न करावे. रोड रोमियो किंव्हा प्रेम विर त्तुम्ही नक्की बनणार.
२०) भांडखोर पत्नी, आर्दश-प्रगत नारी; भांडखोर पति, अत्याचारी पुरुष.
२१) पत्निने ओफिस मध्ये केलेला फोन म्हणजे प्रेमळ,काळजी करणारी पत्नि; पतिने फोन केला तरी संशयी पति.
२२) मुलगी जन्मास आली तर सेलेब्रेट केलेच पाहिजे. हात आखडता घेतला तर स्त्री विरोधी.
२३) स्त्रीने पुरुषाच्या शरिराला स्पर्श करुन उपभोग घेतला तर ते प्रेम, पुरुषाची वाहवा, पुरुषाने स्त्रीला स्पर्श केला तर विनयभंग, बऱ्याच वेळेस बलात्कार सुध्दा.
२४) पुरुषाने, स्त्रीला प्रश्न विचारु नये; स्त्रीने पुरुषाला प्रश्न विचारणे हक्क आहे.
२५) लेडिज फस्ट
२६) स्त्री अबला आहे.
२७) स्त्रीने कुंटुंबाची बारादारी केली तरी चालेल पण तीचे पॅशन पुर्ण करावे ; पुरुषाने कुंटूबाची जबाबदारी पुर्ण करावी त्याचे पॅशन म्हणजे मुर्खपणा आहे.
ह्या आणि अश्या अनेक दबावतंत्रा द्वारे पुरुषाचे खच्चिकरण होत आहे. पुरुषांचे ह्र्दय विकारात , ह्रदय विकाऱ्याच्या झटक्यात मरण्याचे प्रमाण खूप आहे व ते वाढत आहे. पुरुषाचे सरासरी आयुष्य, स्त्री पेक्षा ५-१० वर्षांनी कमी आहे. शहरात तर ते दिवसें दिवस कमी होत आहे.
पुरुषांनी बलिदान देऊन दिल्ली मेट्रो बनवायची पण संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, जेव्हा सर्वांना घराची ओढ असते, कोठेच ज़ागा नसताना, जेव्हा काही पुरुष "स्त्रींसाठी आरक्षित" बोगी चा आधार घेता तर त्याना बेदम मार द्यावा. (पुरुषांसाठी आरक्षित बोगी का नाही?, "स्त्री आरक्षित" बोगी रिकाम्या कश्यासाठी? , "आरक्षित" बोगी कशासाठी?) पुरुषांना कुत्रापेक्षा कनिष्ट समजावे. मुंबई मेट्रोत की पुण्यातील बस सगळी कडे तेच हाल. पुण्यातील जेल...हो जेलमध्ये सुधा आरक्षणाची हीच परिथिती आहे.
http://legalfighter.wordpress.com/2010/12/02/letter-to-delhi-metro-demanding-male-only-coaches/
http://legalfighter.wordpress.com/2011/01/13/beating-men-feasible-safeguarding%E2%80%99em-aint/
आपला सारासार विवेक मेला का ?
किती सहन करऱ्याचे पुरुषांनी ?
किती दिवस गप्प बसयाचे ?
संघटीत होऊन का नाही आवाज बुलंद करऱ्याचा ?
पुरुषांचे खच्चिकरण थांबलेच पाहिजे. ते ही आज पासुनच.
-- सिफ पुणे --
1 comment:
Very Well Said.
Post a Comment