April 28, 2011

भारतात विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण दुप्पट आहे.


भारतात विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण दुप्पट आहे.

राष्ट्रीय अपराध रिकार्ड ब्यूरो - National Crime Record Bureau (NCRB) हि भारताची सरकारी संस्था आहे.
हि संस्था भारतीय गृह मंत्रालयाचा एक भाग आहे. हि संस्था संपूर्ण भारतातील गुन्हांची नोंद ठेवते.

लेटेस्ट म्हणजे २००९ मध्ये प्रसिद्ध केलेली आत्महत्या विषयीची माहिती अशी आहे.

0) अविवाहित मुले : १७,७३८
0) अविवाहित मुली : १०,०६३
0) विवाहित मुले (पती) : ५८,१९२
0) विवाहित मुली (पत्नी) : ३१,३००
0) विदुर(Widower) : ,८४८
0) विदुरी(Widowed) : ,६७४
07) घटस्फोटीत पुरुष : ६३५
0) घटस्फोटीत महिला : ६१३
0) विभक्त पती : २०५३
१०) विभक्त पत्नी : १०३०

एकूण पुरुष : ८१,४७१
एकूण स्त्रिया : ४५,६८०

२००९ चे पुरुष:स्त्री आत्महत्याचे प्रमाण
१७८ पुरुष : १०० स्त्रिया

आणखी काही आधारभूत मुद्दे :
) प्रत्येक नवव्या मिनिटाला एक विवाहित पुरुष आत्महत्या करीत आहे.
) विवाहित पुरुषाचे आत्महत्या करण्याचे प्रमाण हे विवाहित स्त्री पेक्षा दुप्पट आहे.
) भारताला स्वतंत्र मिळून ६०+ वर्ष झाली आहे तरी देखील आता पर्यंत एक रुपया सुद्धा पुरुषाच्या देखभालीसाठी राखून ठेवला किंव्हा खर्च केला.
) प्राण्यांसाठी मंत्रालय आहे त्याची काळजी घेण्यासाठी पण पुरुषांसाठी एक पण मंत्रालय नाही त्याची काळजी घेण्यासाठी.
) ८२% पेक्षा जास्त कर पुरुष भारतात आणि एकसारखाच पगार असून देखील पुरुषच स्त्रीपेक्षा जास्त कर भरतात.
) भारतात १५+ पेक्षा जास्त पुरुष-द्वेषी कायदे आहे प्रत्येक भारतीय पुरुषाला गुन्हेगार मानते आणि त्यालाच तो निर्दोष आहे असे सिद्ध करावे लागते. (Guilty Until Proven Innocent) . हे सगळे कायदे पुरुषांकडून कायदेशीर-खंडणी गोळा करण्यासाठी बनविले आहे. थोड्याच दिवसात असे अनेक पुरुष-द्वेषी कायदे तयार होणार आहे.
) सरासरी १४,७९१ पुरुष कौटुंबिक हिंसेचे शिकार होत आहे. (खालील दिलेला कौटुंबिक हिंसा चे पान वाचा)
) पुरुष एक नुन्गंड सहित जीवन जगत आहे. “स्त्रीमुक्ती”, “स्त्री सशक्तीकरण”, “पुरुष प्रधान समाजअसे शेरे मारून पुरुषाला त्याचा जीवनाच्या मुलभूत हक्कापासून दूर ठेवले जाते.
) सर्वात धोकादायक, जोखमीची, अथक शाररिक श्रमाची, गलिच्छ कामे पुरुष करतात. अग्निशामक दल, देशाचे सैन्य, पोलीस, अति उंचीवरील बांधकामाची कमी, खोल गटार, खाणी तील मजदूर, होटेल मधील मोठमोठी स्वयंपाकघर, रेल्वे-बस येथील कॅन्टीन, भल्या पहाटे वर्तमान-पत्र आणि दुधाचे वाटप असे किती तरी धोकादायक, जोखमीची, अथक शाररिक श्रमाची, गलिच्छ कामे पुरुष करतात पण त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते. जेवणातील मिठा प्रमाणे पुरुष हे समाजात आहे. त्यांचे अस्थित्व दुर्लक्षित असते पण त्यांचे योगदान फार मोठे आहे.
१०) पुरुषांचे अपघातात मरण पावण्याचे प्रमाण तिप्पट आहे, पुरुषाला किडन्याप( ओलोस धरणे) चे प्रमाण तिप्पट आहे, असे असून देखील पुरुष संरक्षणासाठी एकपण कायदा नाही. या उलट पुरुष-द्वेषी कायदे निर्दोष पुरुशालापण जेल ची हवा खाण्यास भाग पडतात.
११) भारतात जन्मच्या वेळी मुलांचे मरणाचे प्रमाण अधिक आहे मुलींपेक्षा.
१२) प्रसार माध्यमे (Print & Electronic) हि सुद्धा पुरुष-द्वेषीच आहे. पुरुष वरील कोणताही आरोप ते रक्तरंजित, मीठ-मसाला लावून प्रसिद्ध करतात. भाबड प्रेक्षक वर्ग ते पाहून आणखी पुरुष-द्वेषी होतो. हीच प्रसार माध्यमे जेव्हा पुरुष निर्दोष सुटतो तेव्हा मात्र गप्प बसतात. खोट्या आरोपिन बद्दल शांत बसतात.

वरील सगळे मुद्दे NCRB च्या आकडेवाडीला साजेसे आहे. जेव्हा पुरुष-द्वेष हा समाजातील प्रत्येक घटकात त्याच्या चरम सीमेवर असतो तेव्हा पुरुषाला आत्महत्या शिवाय दुसरा मार्ग नसतो.


कौटुंबिक हिंसाचार : पुरुषाचे मरण यंत्र.
NCRB च्या सर्वेक्षणा नुसार घरातील वाद, कौटुंबिक ताण-तणाव, नवरा-बायको मधील लहान मोठे विवाद, कौटुंबिक हिंसाचार हि सर्वात प्रखरतेने जाणवलेले कारणे आहे. जवळजवळ ३०% आत्महत्या ह्या कौटुंबिक लहान मोठे वाद-विवाद आणि त्यातील ताण-तणाव मुळे होतात.

दरवर्षी आत्महत्या करणाऱ्या ५८,१९२ पुरुषांपैकी १७,४५८ विवाहित पुरुष कौटुंबिक हिंसाचार ला बळी जातात. १९९६ शी तुलना केली तर ४४% नि आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. साहजिकच १९९६ मध्ये, कौटुंबिक हिंसाचार मुळे १२,१२४ पुरुषांनी आत्महत्या केलीच असेल.

अंकगणिताचे मापदंड(Mean of the two extremes) वापरले तर दर वर्षी सरासरी १४,७९१ पुरुष कौटुंबिक हिंसाचारच्या त्रासा मुळे आत्महत्या करतात. मागील १३ वर्षा(१९९६-२००९) चा लेखाजोखा घेतला तो आकडा येतो ,९२,२८३ म्हणजेच साधारणत: दोन लाख !
ह्या तुलनेत महिलांचा अंक येतो ,०३,२४८ म्हणजेच साधारणत: एक लाख !

येथे स्पष्ट होते कि, इतर आत्महत्याच नाही तर कौटुंबिक हिंसाचार मुळे देखील पुरुषाचे आत्महत्याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा दुप्पट आहे. पुरुषांना संरक्षणाची गरज असताना, नोर्दोष असूनही त्यांना शिक्षा दिली जाते. पुरुष-द्वेषला खत पाणी घातले जाते.

वरील माहिती हि पुरुष-द्वेषी लोकांसाठी एक मोठी चपराक आहे.

पुरुष-द्वेषी भावने मुळे, समाज हा गांधीजीच्या प्रसिद्ध तीन माकडांसारखे काहीही ऐकत नाही, काहीही बघत नाही आणि काहीही बोलत नाही. सगळे दुर्लक्षित करतात.

खरे ना ?


मूळ लेख,
http://legalfighter.wordpress.com/2011/01/10/married-men-are-twice-as-vulnerable-to-suicide-due-to-domestic-violence-compared-to-married-women/

भाषांतर,
-- सिफ पुणे.







April 24, 2011

मुलगा Vs मुलगी

जेव्हा
मुलगी रडते ...
तेव्हा
सर्वजण तिची समजूत काढतात !!!

पण
जेव्हा मुलगा रडतो....
तेव्हा
सर्वजण म्हणतात " काय रे मुलीसारखा रडतोय " !!!

जेव्हा
मुलगी एखाद्या मुलाला थोबाडीत मारते ....
तेव्हा
सर्वजण म्हणतात " मुलानेच चूक केली असेल " !!!

जेव्हा
मुलगा एखाद्या मुलीच्या थोबाडीत मारतो ....
तेव्हा
सर्वजण म्हणतात " मूर्ख मुलगा ..' समजत नाही कि एखाद्या मुलीशी आदराने कसे वागावे " !!!

जेव्हा
मुलगा एखाद्या मुलीशी बोलत असतो ....
तेव्हा
सर्वजण म्हणतात " तो तिची छेड काढतोय " !!!

जेव्हा
मुलगी एखाद्या मुलाशी बोलत असते....
तेव्हा
सर्वजण म्हणतात " ती फार मैत्रशील आहे " !!!

जेव्हा
मुलगी एखाद्या अपघातात सापडते .....
तेव्हा
सर्वजण " दोष समोरच्या पक्षावर (Party ) टाकतात " !!!

पण
जेव्हा मुलगा एखाद्या अपघातात सापडतो .....
तेव्हा
सर्वजण म्हणतात " मूर्ख मुलगा.. समजत नाही, गाडी कशी चलवायची "!!!


आणि
तरीसुद्धा लोक म्हणतात "आजकालचे जग , हे फक्त पुरुषांचे जग आहे "



April 17, 2011

भोंदू बाबा एक बातमी ; पुरुष द्वेषी वर्तमान-पत्र / प्रसार-माध्यम ?


भोंदू बाबा एक बातमी ; पुरुष द्वेषी वर्तमान-पत्र / प्रसार-माध्यम ?






भोंदू बाबा एक बातमी ; पुरुष द्वेषी वर्तमान-पत्र / प्रसार-माध्यम ?

April 2, 2011

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ; स्वामी तिन्ही जगाचा वडिलां विना दरिद्री, चोर आणि बलात्कारी.


स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ;
स्वामी तिन्ही जगाचा वडिलां विना दरिद्री, चोर आणि बलात्कारी.








संकलन,
सिफ , पुणे.
http://aimwa.in/