February 27, 2011

पिडीत पत्नीच्या भावास पडलेले काही रोचक प्रेश्न व त्याची तितकीच रोचक उत्तर


## पिडीत पत्नीच्या भावास पडलेले काही रोचक प्रेश्न त्याची तितकीच रोचक उत्तर. ##

Q1) पत्नीला/स्त्रीला लग्नाच्या पहिल्या दिवसापासून जर हुंड्यासाठी तिच्या सासर कडील लोक त्रास देत असतील तर ?

उतर: लग्न हे प्रेम, जिव्हाळा, नाते जोडणारे असते. परतू काही लबाड, लोभी लोक त्याचा व्यवहार करतात. कष्ट न करता, श्रीमंत राहणीमान जगण्यासाठी, मोठ्या पगारावाल्या किंव्हा भरपूर पैसा कमावणारा मुलगा शोधतात, त्यासाठी असे माणसे “मोठी ऑफर” पण देतात. हि त्यालोभी लोकांनी ओढवलेली/बोकाळलेली प्रथा आहे. त्यांचा लोभ त्यांना उत्तर शोधू देणार नाही.


Q2) असा अत्यचार जर दररोज होत असेल तर ?

उत्तर: अत्याचार करण्याची कोणाला हौस नसते. विनाकारण कोणी विरोधपण करत नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. जर पत्नी परपुरुष बरोबर पाठ लावत असेल आणि तिच्या पती, तिला विरोध करत असेल तर तो तिच्या वर अत्याचार होतो का ? पतीच्या घरी, पत्नीच्या नंगा नाचस विरोध केला तर तो अत्याचार होतो का ? लोभ अशा लोकांना उत्तर शोधून देणार का?


Q3) स्त्रीला जर संपूर्ण दिवसभर उपाशी ठेवले, तिला काही खायला दिले नाही तर ? तिला जर एक ग्लास पाणी सुधा दिले नाही तर ?

उत्तर: स्त्रीने कमीत कमी स्वताची(नाही घराची तर) जबाबदारी स्वीकारावी , घरी बसून फुकटचे गिळण्यात व दुसर्यास दोष देयात वेळ वाया घालावू नये. कष्ट करावे म्हणजे पोटाची खळगी भरण्याची चिंता राहणार नाही.


Q) पतीच्या डायरी मध्ये त्याच्या लग्ना आधी नंतर चे अफैर, बद्दल आढळले तर ?

उत्तर: पत्नीचे नेहमीचे टोचून बोलणे, “तुझ्याशी कोणी लग्नच करत नव्हते, मी हो म्हणाली म्हणून तुला बायको मिळाली.” याला काय उत्तर आहे ? ते पण एकच वाक्य. पत्नीचा संशयी आणि चाचपडण्याचा स्वभाव पतीला माहित आहे.


Q) जर पहाठे पहाठे बळजबरी उठवले, ते पण कडकेदार थंडी मध्ये तर ?

उत्तर: ह्या जीवनाच्या स्पर्धमध्ये टिकायचे असल्यास गांडीवर लाथ मारून उठवले पाहिजे, प्रत्येकाने कष्ट केलेच पाहिजे. थंडीची पहाठ असो को रात्र.


Q) स्त्रीला सासरकडील वागणुकी मुळे खूप त्रास होत असेल तर ?

उत्तर: लोभ तुम्हाला उत्तर शोधू देत नाही का ? संसारात दु:खी असाल तर फारकत/ घटस्फोट घ्या. स्वत:च्या तत्व, मुल्यासाठी जगा, कष्ट करून पैसे कमवा आनंदी जीवन जगा. पुरुषाला पण त्रास असतोच कि.


Q) स्त्रीच्या लहानपणीच तिचे आईवडील वारले असतील आणि आता तिला तिचे सासरकडील पण त्रास देत असतील तर?

उत्तर: तुमची कोणती मानसिकता पुन्हा असे प्रेश्न उपस्तित करतात ? सहानभूतीचा केविल प्रयत्न का करतात.


Q) स्त्रीला दु: होत असेल, जर तिचे वडील जिवंत असते तर तिला असे दिवस पाहवयास नसते लागले.

उत्तर: जर तिचे वडील जिवंत असते तर, लग्नात कमी खर्च केला म्हणून दोष दिला असता, तिच्या मैत्रिणींना छान नवरा मिळाला तिला का असा घाण नवरा शोधला म्हणून दोष दिला असता, आईवरील राग माझ्यावर काढला, इ. वेगवेगळे दोष दिले असते. पुरुष नेहमी असे खच्चीकरण निपुटपणे भोगत असतो.


सांरांश :
स्त्री दुखी कष्ठी असेल तर स्त्री ने फारकत/घटस्फोट घेऊन तिच्या स्वत:च्या कष्ठावर जगावे. कष्ठ करून पैसे कमवावे. पुरुषाच्या पैशावर डल्ला मारू नये.



-- सिफ पुणे --

February 19, 2011

“प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते” आणि “सत्य”.


प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असतेआणिसत्य”.


यशस्वी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीकडे पैसा आणि प्रसिद्धी आहे.
पैसा महत्त्वाचा, तो असला तर तुम्हाला तुमचे नातेवाईक मित्रमंडळी यशस्वी म्हणतात. खोटे वाटते का ? तुमच्या आजूबाजूला जरा निट काळजी पूर्वक लक्षपूर्वक निरक्षण करा. प्रसिद्ध व्यक्तीचे वैरी पण असतात त्यामुळे ते कु-प्रसिद्ध पण असतात. त्यांना अयशस्वी मानणारे भरपूर असतात.
म्हणूनच यशस्वी व्यक्तीची सर्व साधारपणे मान्यता पावलेली व्याख्या म्हणजे. ज्या व्यक्तीकडे पैसा आहे तो यशस्वी.


पैसा असला म्हणजे चैनी वस्तूचा उपभोग घेता येतो. यशस्वी व्यक्तीला सर्व साधारपणे मान्यता त्यामुळेच मिळाली.


पैसा , प्रसिद्धी आणि शक्ती मिळवण्याच्या ह्या स्पर्धे मध्ये पुरुष नेहमी पुढे राहतील. कारण पुरुषाने कधी मदतीची , आरक्षणाची मागणी केली नाही. त्यांनी कधी सहानभूती ची मागणी कली नाही. केली तर ती फार नगण्य आहे. लहानपणा पासून घरा बाहेरील व घरातील जोखमीचे, जबाबदारीचे कामे नेहमी पुरुषाने केली साहजिकच आहे ते.
टाळाटाळ न करणे, कामाजोरीचे करणे न सांगणे. जोखीम आणि जबाबदारी घेणे त्यामुळे कोणतापण व्यक्ती पसंतीस फस्ट येणार.


साहजिकच जोखीम जेवढी, तेव्हढेच बक्षीस पण मिलनास. न्युटनचा सिद्धांत नाही , हा निसर्ग नियम आहे.


महिलांचा गैरसमज आहे कि त्या कमजोर आहे. पण वस्तुतः त्या आळशी आहे. कमजोरीचा बहाणा करून ती , कमी जोखमीत काम करू पाहते म्हणजे जोखीमिचे काम पुरुष वर लादते. जगातील सर्व सैनिकी लढाईत स्त्रियाचा सहभाग आहे पण ते कधी फंट ला नाही आले, कारण मरणाची भीती, पकडले गेल्यास विरोधी सैनिकांनी केलेला अमानुष शाररिक व मानसिक अत्याचार न सहन करण्याची भीती. परिणामी , आज पण पुरुष सैनिकांचे मरणाचे प्रमाण खूप आहे. पकडले गेल्यास अमानुष अत्याचार पुरुष सैनिकालाच सहन करावा लागतो. खरे आहे ना , प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते ?


सैनिकी भरती नंतर पुरुष फार कमी सुविधान मध्ये प्रशिक्षण पूर्ण करतात. स्त्री सैनिक बघा कसे मागणीसाठी धरणे धरतात आणि आपल्याच मिलिटरीचे खच्चीकरण करतात.
खरे आहे ना , प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते ?


मुलगा शिक्षण घेतो विना अनुदानाचे, मुलांच्या होस्टेल मधील सुविधा आणि मुलीना दिल्या जाणाऱ्या सुविधान मध्ये खूप तफावत आहे. मुले प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शिक्षण पूर्ण करतात. जवळ जवळ सर्वच मुलांना पार्ट टाईम काम पण करावे लागते. हि परिस्थिती संपूर्ण भारतातील आहे. खरे आहे का , प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते ?


मुलाला जेव्हा जोब मिळतो तेव्हा त्याला त्याच्या घराचा संभाळ करावा लागतो. घरी पैसे पाठवावा लागतात. घरातील खर्चात हातभार लावा लागतो. जोब मिळाल्या नंतर किव्हा धंद्यामध्ये, मुलगा जीव ओतून काम करतो. प्रमोशन मिळवतो, प्रगती करतो. ह्या उलट मुलीच्या कमाई ला बचत खात्याचा मार्ग दाखवला जातो. मुलीचे शिक्षण होते ते तिच्या एवढे किव्हा त्यापेक्षा जास्त शिक्षण झालेला मुलगा तिला नवरा म्हणून मिळावा यासाठी.

लग्नसाठी, मुलगा , कमी शिकलेली , न-शिकलेली , कमी कमवणारी, न कमवणारी, मुलीला पण पसंती देतो. सद्य स्तीत १० वि पर्यंत कोणी नापास होत नाहि, अशा शिक्षित मुली, शेतकरी मुलाला , मिलिटरीतील मुलास पसंती देत नाही. कारण काय तर जोखमीचे , कष्टाचे जीवन नको. कोठे आहे राष्ट्र भक्ती ?

मुलीना नवरा हवा कसा तर वेल सेटल. वेल सेटल म्हणजे, मोठी पगारावाली नोकरी, स्वतःचा बंगला किव्हा फ्ल्याट, स्वताची कार, कुतुन्भा पासून दूर म्हणजे शकतो कुटुंबाची कमी जबाबदारी असा मुलगा. आता अश्या मुलाला आणखी काय यशस्वी व्यायाचे आहे. खरे आहे का , प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एक स्त्री असते ?


लग्न नंतर घरात सुख हवे असेल तर पत्नी शी भांडू नका. तिला हवे तसे तुम्ही वागा. असे केल्यास तुम्हाला तुमचा जोब, धंदा या कडे जीव ओतून लक्ष देता येते. साहजिकच पुरुष त्याचे नॉर्मल जीवन जगतो व काही वर्षात अमाप पैसा, प्रसिद्धी कमवतो. पत्नी ने त्रास दिला नाही तर तो पुरुष यशस्वी होतो. जर नातेवाईक यांनी त्या पुरुषालाजोरू का गुलामम्हणून त्रास दिला नाही तर तो पुरुष यशस्वी होतो. ( http://www.wemen.us/index.php/articles/views/714-joru-ka-gulam-vs-maa-ka-laadla.html ) जर त्याने लग्न केले नाही तर तो त्याची यशस्वी वाटचाल पूर्ण करणार नाही का ? मवाली गुंडांनी त्रास दिला नाही तर कोणताही साधा माणूस, अथक परिश्रमाने अमाप संपतीचा मालक होतो. हा निसर्ग नियम घरात लागू होत नाही का ? त्रास न देणे एवढेच स्त्रीचा हातभार. हे खरे आहे कि, पुरुषास मानसिक आधार लागतो. पण तो सर्वांनाच लागतो. आणि त्या आधारासाठी पत्नी किव्हा स्त्री च पाहिजे असे काही नाही. मानसिक आधार कोणी भाऊ , वडील , मित्र किव्हा स्याम्सेवी संघटना, समाज पण देऊ शकतो. स्त्री चा आधार जस्ट एक ऑप्शन आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एक स्त्री असते का ?


स्त्रीला समाज्यात वावरण्यास पोलिसांचे संरक्षण हवे. पण मग स्त्री का भरती होत नाही पोलीस मध्ये , रात्रीच्या ग्रस्ती त्यांनी पण घालाव्या. पुरुष पोलीसांनीच का म्हणून रात्रीच्या गुंडांचा सामना करावा. त्यांना पण परिवार आहे त्याना पण चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे. बरे रात्री अपरात्री फिरणाऱ्या ह्या पोरी कोण ? आणि का फिरतात रात्री. सभ्य घरात तर मुले सुद्या घरात असतात एकत्रित जेवणासाठी. बरे मुले रात्री बाहेत फिरली तर त्यांना पण गुंडाचा तेवढंच धोका असतो. मुले करतात का वाढीव पोलीस संरक्षणची मागणी. खरे आहे का , प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एक स्त्री असते ?


प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते हे साफ खोटे आहे ह्या उलट स्त्री हि नेहमीच यशस्वी पुरुष माघे धावते. स्त्रिया स्वताची खुशामत करण्यात “प्रवीण” आहे  म्हणून पसरवतात अफवा. पुरुष त्या कडे दुर्लक्ष करतो म्हणून त्यांचे बरेच फावते.
Tiger Woods, Bill Clinton, Barack Obama, Dhoni, Pace, Shahruk असे प्रसिद्ध आणि पैसे वाले पुरुषान माघे स्त्रिया कायम असतात व नाना तऱ्हेचे जाळे टाकतात. स्त्री पुरुषाला कंट्रोल करून त्याचा पैसाचा व प्रसिद्ध उपयोग करून घेता. पैश्यावाल्या पुरुष साठी स्त्रिया , पुरुषाचे वय आणि देखणेपणा दुय्यम करून पसंती देतात. खरे आहे का , प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एक स्त्री असते ?


भारतात (व जगातील सर्वच देशांमध्ये ) , स्त्री हक्क साठी मंत्रालय आहे. एवढेच काय तर पशु साठी सुधा मंत्रालय आहे पण पुरुषचं हक्क साठी एक पण मंत्रालय नाही असे का ? किती दिवस असे चालायचे ?


उलटपक्षी जीवनचा अंत करण्यास स्त्री पुढे असतात. रावणाची शुरफनखा असो, रामाची सीता असो . बिल ची मोनिका असो . स्त्री चा वाट मोठा आहे पडझड मध्ये.


ह्याचा अर्थ स्त्री कमजोर आहे असे काही नाही. माझ्या मते स्त्रीपण पुरुषा प्रमाणेच सम प्रमाणात मजबूत आहे. किबहुना त्या अति बळकट आहे काही ठिकाणी, मुद्दा फक्त असा आहे कि , स्त्री कमजोरी चा बहाना करून, जबाबदारी, जोखीम टाळते. आरामत मिळणाऱ्या सुविधा , आरक्षण , सहानभूती , पैसा ती तिचा हक्क म्हणून मागते. फुकटवर जगण्याची घाण सवय तिला आवडते.
ते तिने बंद करून कष्ट करावे. समाजाने पण तिला तसे करण्यासाठी आग्रही राहावे.


उन्नत समजाकडे वाट मोकळी करावी.



-- सिफ पुणे --

सूड भावनेने तिने दिला २७ पुरूषांना एड्स!

====================================================

सूड भावनेने तिने दिला २७ पुरूषांना एड्स!
AIDS : Just for Revenge, She infected 27 men.

http://starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=17282

====================================================



सूड भावनेने तिने दिला २७ पुरूषांना एड्स!
स्टार माझा वेब टीम, मुंबई

एका सुंदर चेहऱ्याच्या तरूणीने तब्बल २७ पुरुषांच्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे. फक्त सूडाच्या भावनेने पेटून उठलेल्या या महिलेने तब्बल २७ जणांना एचआयव्हीची लागण केली. हा सिलसिला अजूनही सुरुच आहे.

डॉक्टरचा मुलगा असो, की बिझनेसमन, सेल्स बॉय किंवा टॅक्सी ड्रायव्हर जो कुणी या सुंदर चेहऱ्यावर भाळला, तो एचआयव्हीची शिकार बनला. या महिलेच्या खतरनाक खेळामुळे मध्य मुंबईत खळबळ उडाली आहे. ज्या डॉक्टर गिलाडा यांच्याकडे तिच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या अंगावरही तिचे नाव काढल्यावर काटा येतो.
अनेक पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना शिकार बनवण्याची ही कुरापत फक्त आणि फक्त बदला घेण्याच्या मानसिकतेतून आल्याचे डॉक्टर गिलाडा यांनी सांगितले. २००५ मध्ये या महिलेला तिच्या नवऱ्याने सोडून दिले, त्यावेळी ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समजल, आणि त्यानंतर सुरु झाला एचआयव्ही पसरवण्याचा घातक सिलसिला....
एका मध्यमवर्गीय घरातील ही सुंदर तरुणी आपली शिकार शोधण्यासाठी मोलकरणीचेही काम करते. आणि घरातील मालकाला किंवा त्याच्या तरुण मुलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य कायमचे नेस्तानाबुत करते.
या तरुणीच्या खतरनाक खेळाची पोलखोल तिच्याच बहिणीने केली आहे. अनेक वेळा कुटुंबियांनी या महिलेला लोकांच्या आयुष्याशी न खेळण्याचा सल्ला दिला. पण त्यावर या महिलेने कुटुंबियांनाच एचआयव्हीची लागण करण्याची धमकी दिली. आणि घाबरलेल्या कुटुंबियांची मुस्कटदाबी झाली....

एकामागे एक असे अनेक तरुणांना ती आपल्या जाळ्यात ओढते. कायद्याने हात बांधले असल्याने या तरुणीची ओळख सार्वजनिक करता येत नाही. त्यामुळे या तरुणीच्या तावडीतून लोकांना वाचवण्यासाठी सध्या तिच्यावर मानोसोपचार करण्याचा विचार डॉक्टर करीत आहेत. त्यामुळे कुठलाही अनोळखी सुंदर चेहरा जर तुमच्या गळी पडत असेल तर सावधान राहा.

Link:
http://starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=17282

February 12, 2011

“४९८-अ”, “डी.वि.” पत्नीचे लक्षणे.


४९८-”, “डी.वि.पत्नीचे लक्षणे.


कुटुंब:
• नव्याने श्रीमंत झालेले,
• शो-ओफ(show-off) करणारे, घरातील महाग खरेदी केलेली वस्तू, गाडी, फ्ल्याट, घरातील रंगरंगोटी, इ. दाखवणे,
• गप्पामध्ये राजकारणी, उच्च पदावरील अधिकारींचा, जज, वकील, पोलीस अधिकारी यांचा उल्लेख करणे.
• कोर्ट-कचेरीचा अनुभव असणे/सांगणे.
• मोलकरीण, नोकरास मारहाण करणे.
• सतत हवेच राहणे आणि जगणे.
• स्त्रिया नेहमी मेकपचा वापर करतात.
• बघ्याची(हाजी हाजी) भूमिका घेणारा बाप.
• कॉलेज मधील भरपूर अफेअरस, मुलांना फिरवणारी.
• स्त्रीचा बोलबाला असलेले कुटुंब.
• पैशाचा हाव असणे.


भरपूर प्रेम असल्याचे भासवणे.
• “मी/आम्ही कधी कोणावर इतके प्रेम केले नाही. आमचे पूर्व जन्माची पुण्याई म्हणून असा पती/जावई मिळाला.”
• पती/जावई याने आपल्या(घरच्यांच्या) मर्जी प्रमाणे वागावे यासाठी आटापिटा करणे.


जळखाऊपणा / हलके मन :
• शुल्लक विचारपूससाठी वारंवार क्वाल करणे.
• अचानक घरी भेट देणे.
• घराबाहेर जाण्यास मज्जाव करणे.
• फोनवर बोलत असल्यास, जवळ येऊन बोलणे ऐकणे.
• कोट आणि कपड्यावर सेंट चा वास येतो का ते चाचपटून पाहणे.
• लिपस्टिक च्या खाणा खुणा शोधणे.
• खिसा व त्यातील पाकिटावर डला मारणे.
• पतीची कोणी स्तुती, प्रश्नषा केली तर जलफात होणे.
• पतीने कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचा राग राग करणे. तसे वागण्यात दाखवणे.
• मित्र मैत्रिणीन च्या वाईट वागणुकीच्या घटना रंगून सांगणे.
• मित्र मैत्रिणीन चे चांगले बोलून चेहरा उदार करणे.



-वास्तव मागणी:
• तुम्ही “Perfect Man” होण्याचा रेटा. म्हणजे तुमच्यात कमी आहे याची सतत जाणीव करून देणे.
• तुम्ही , तिची व तिच्या घरच्यांची सगळ्या मागण्या पूर्ण करणे.



वेगळे(ताटातूट) करणे/दूर नेणे.
• तुम्हाला तुमच्या नातेवाईक व मित्रमंडळी पासून दूर ठेवणे.
• तुमच्या शुभचिंतकाना, भांडणाचे कारण करून तुमच्या पासून दूर ठेवणे.


अंगुली दर्शन :
• स्वताच्या चुकांसाठी इतरांना दोष देणे.
• कोणत्याहि प्रोब्लेम साठी इतरांना दोष देणे.
• तिचा बॉस , घरातील नोकर, कोणावर हि दोष देऊन स्वताचे टेन्शन कमी करू पाहता.
• काम चोर स्वभावाला उत्तर म्हणून नाना तऱ्हेचे आजाराच कारणे सांगणे.
• स्त्री गुप्त रोगाचे बहाणे करून सहानभूती मिळवणे.



अति भावनिक आणि हिंसक प्रवारिती:
• छोट् छोट्या बाबींवर पटकन अपमान मानणारी.
• शुल्लक गोष्टीसाठी , स्त्रीमुक्ती–पुरुषप्रधान समाज चा आधार घेणे.
• पाळीव प्राणी किव्हा घरातील लहान मुलांवर राग काढणे.
• टीवी वरील कार्यक्रम मध्ये गुंतून जाणे. त्यातील उदाहरणं भांडण्याच्या वेळी सांगणे.
• मुडी , क्षणात खूप प्रेमळ वरून मारझोड वर येणे. हातातील वस्तू फेकून मारणे. तुम्हास काही समजेल तेव्हडयात पुन्हा नॉर्मल होणे.




प्रणय प्रसंगी कपट कंट्रोलीग :
• प्रणयक्रीडा ची सुरुवात करुणे ब नंतर गरज पुरुषवर लादणे.
• पुरुषांच्या “त्या” भावनांना ठेस लागेल असे वारवार बोलणे.
• “कपट” वस्तूंचा वापर करून आनंद लुटणे व नंतर पुरुषावर “Result” बाबत दोष देणे.



फटकळ बोलणे :
• फटकळपणा हा मुखतः उठून दिसणारे लक्षण आहे.
• पुरुषास त्रास होणार असे पटकन बोलणार, तेही काही “पूर्ण” विचार करून.
• विशेतः असे बोलणे. तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईक ह्याच्या समोर बोलणे, जेणे करून सामाजिक समारंभात तिचा, पती वचक राहील व पती नेहमीच “Confused mode” मध्ये वावरेल. पती कळणारच नाही त्याची काय चूक होती आणि त्याने काय सुधार केला पाहिजे.
• तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सदस्याला, कोणतेही कारण दाखऊन शिव्या देणे.




मालकी हक्क गाजवणे, धमक्या आणि हिंसक प्रवारिती.
• शुल्लक गोष्टी वर वाद घालणे. विशतः तुम्ही घरी उशिरा आल्यावर.
• तुमचा सगळ्या property वर हक्क हवा. प्रत्येक ठिकाणी तिच्या नावाचा उल्लेख करण्याचा रेटा.
• मोलकरीण, नोकरास मारहाण करणे.
• मारहाणीस विरोध करणे, त्याचा तिटकारा करणे. कधी मारहाण केली नाही असे भासवणे पण Personal Diary मध्ये मारहाणी केल्याचे नमूद करणे. कोणाला तरी दोष देऊन आपल्याला तसे करण्यास भाग पडल्याचे सांगणे.
• अश्या स्त्रीच्याचे काही ठराविक वाक्ये :“माझे आई-वडील माझी नेहमी पाठराखण करतात. मी कोणाचा खून केला तरी ते माझी बाजू घेऊन मला पूर्ण मदत करतील.”, “स्त्री नेहमी बरोबर असते. समाज्याने त्यांच्या वर विश्वास ठेऊन त्यांना पुढे येऊ द्यावे.”, “जेवणात विष कालऊन संपून टाकेल एकदाची कटकट.” , “खाटिक बोकडाचे जसे तुकडे करतो तसे मी तुकडे करील” थोड्याच वेळात म्हणणे “हे तर मज्जाक/मजे मध्ये म्हटलेले वाक्य होते, सर्वच तसे जोक करतात.”, “माझ्या बोलण्याचा तो अर्थ नाही.”


=====================================================================================


काही प्रसिद्ग पुरुष व्यक्तीची उदाहरणे ज्यांनी निमूट पणे मार सहन केला आहे.

अब्राहम लिंकम(Abraham Lincoln) : इतिहासकार, Connecticut College चे प्रधापक Michael Bulingame, आणि “The Inner world of Abraham Lincoln” चे लेखक याच्या उल्लेख नुसार, Mary Todd हिने अब्राहम लिंकम यांना नेहमीच मारले आहे. एकदा तर शेकोटी मध्ये जळन न ठाकल्यामुळे लाकडाच्या दंडुक्याने मारले.

हुम्प्रे बोगार्ट (Humphrey Bogart) : कित्येक आत्मचरित्र दर्शवल्या नुसार, बोगार्ट यांची पत्नी, Mayo Methot हि नेहमी हिंसक व्याहर करीत असे. त्यांची मित्र मैत्रिणी तिला ‘Slugsy’ म्हणून संभोधत. एकदा तर बोगार्ट याच्या पाठीवर खोल जखम पण झाली.


स्तेफेन होव्किंस (Stephen Hawking): २००४ मधील रिपोर्टस नुसार, होव्किंस ह्याची पत्नी, Elaine हिंसक आणि भांडखोर होती. तिच्या हिंसे मुळे होव्किंस यांना एका दवाखान्यात पण दाखल करावे लागले. त्यांचे मनगट मोडले होते. चेहऱ्यावर वार केल्याच्या खुणा पण होत्या.


बिल क्लिटन ( Bill Clinton ) : Hillary’s Choice ह्या चरित्रात्मक लेखात, Gail Sheehy ह्यांनी नमूद केले आहे. हिलरी ने तिच्या पतीवर बऱ्याच वेळेस हिंसक वागणूक दिली आहे. १९९३ मध्ये हिलरी वर आरोप होता कि तेने तिच्या पतीच्या चेहऱ्या वर वार केले.


=====================================================================================

ह्या वर मात करणाऱ्यासाठी पुरुषा साठी असलेला रामबाण उपाय.
फक्त एकच उपाय आहे. NGO SaveIndianFamily.org जोइन करून लिंग भेद मिटवा. एका समृद्ध समाजाकडे वाटचाल करा.

=====================================================================================


-- सिफ पुणे --

February 11, 2011

पुरुषांचे शाररीक आणि मानसिक खच्चिकरण.


पुरुषांचे शाररीक आणि मानसिक खच्चिकरण.

समाजाने अतिशय नियोजित पध्दतिने चालवलेले, पुरुषांचे खच्चिकरण आपणास माहित आहे का ?

हो.. हो.. पुरुषांचे खच्चिकरण. हसू आले?

पुरुषांच्या वेदनांवर "हसणे" हि पुर्वापार चालत आलेली "समाज सेवा" आहे.

"हसणे" हि प्रतिक्रिया खुपच क्वामन आहे. विशेष: "पुरुषाचे हसणे", स्त्री बऱ्या पैकी जागरुक आहे, तीच्या हक्का बद्दल व पुरुषांचे चाललेले शोषणा बद्दल. त्यामुळे ती शकतो हसणार नाही. तीला त्याची जाणिव आहे. परंतु बऱ्याच पुरुषां माहीतच नाही, त्यांना काही हक्क आहे. त्यांचे कोणी शोषण करत आहे.

पुरुषांचे खच्चिकरण, सर्वसामान्यांना समजणे ही एक जटिल प्रक्ररीया आहे.

मुलत: हे सत्य नेहमीच दडलेले, उपेक्षित राहिले आहे. वर्षांनुवर्ष पुरुषांनी ते मुकाटपणे सहन केले आहे. वेळोवेळी कोणी खोटी स्तुती करुन तर कोणी जबाबदारीची जाणिव करुन त्या कडे राजरोस दुर्लक्ष केले आहे.


महाभारतातील शंतनू असो ,
रामयाणातील राम - श्रावणबाळ असो
किंव्हा आजचा तरुण असो.
पुरुषांचे शोषण निरंतर चालूच आहे.
झोपलेले पुरुष ते मुकाट पणे जगत, सोसत आहे.


पुरुषांच्या त्रासाबद्दल चर्च्या करणे हे "स्त्रीमुक्ति" विरोधी, बक्कवास, वेडपट, माजलेले, जनहित विरोधी, बेजबाबदार मानले आणि समजले जाते. आणि ते टाळले पाहिजे असा समज आहे. बऱ्याच वेळेस तर नपुंसकतेचा, समलैंगिकतेचे शेरे ही मारले जाते. दुभाग्याची बाब म्हणजे असे शेरे मारण्यात पुरुषच पुढे आहे.
मग स्त्री का माघे राहणार ? राखी सावंत चांस मिळताच शेरे मारणार. त्यानंतर "त्या पुरुषाने" आत्महत्या केली तरी, शण्ड मेडिया गप्प बसणार.

http://www.allvoices.com/contributed-news/7311548-rakhi-sawant-drives-a-24-year-old-man-to-commit-suicide/blogs

http://www.allvoices.com/contributed-news/7311548-rakhi-sawant-drives-a-24-year-old-man-to-commit-suicide/blogs


पुरुषाचे खच्चिकरण इतके जटिल आहे की ते पुरुषाला पण पटकन कळत नाही. इतके हे शोषण अंगवळणी झाले आहे.

कितीही त्रास झाला तरी स्त्रीचे( बायको, आई, बहीण, मुलगी) व कुटुंबाचे संरक्षण करणे. कोणतीही मदत माघायची नाही. कोणालाही, होत असलेला त्रास सांगायचा नाही. सांगितले तर तो तुमचा कमी पणा म्हणून समाजाने दुर्लक्ष करयाचे.

हा कोठला ऩ्याय ?

आर्थिक, सामाजिक, शाररिक, मानसिक सर्व प्रकारचे संरक्षण पुरुषाने द्यावे स्त्रीला व कुटुंबाला.
पण पुरुषाला कोण देणार आधार ?


समाजाचे पुरुषावर असलेले दबावतंत्र असे आहे,
१) पुरुषाने भावनिक असू नये. असल्यास ते व्यक्त न करता सहन करावे.
२) पुरुषाने कधीही रडू नये. तो अधिकार फक्त स्त्रीला.
३) ते शाररिक द्रुष्ट्या, रफ अन्ड टफ असलेच पाहिजे. आजकाल तर ते गोरे असावे असा पण दबाव आहे.
४) स्त्री बद्दल तर कधी तक्रार करुच नये.
५) कुटुंबाचे "संरक्षण" आणि "गरजापुर्ण" करणे हे पुरुषांचे प्रथम आणि आद्य कर्तव्य आहे.
६) पुरुषाने त्यांच्या कर्तव्यासाठी सर्व त्याग करावा. (राम, श्रावणबाळ, शंतनू) वेळे प्रसंगी प्राण ही द्यावे. नाराज लोकांची बोलणी पण निमुटपणे ऎकाव्या, त्या मोबद्ल्यात काही अपेक्षा ठेवणे म्हणजे कमीपणा आहे.
७) पुरुषानी सर्वच कठिण प्रसंगानचा सामना करावा. त्यात माघार घेऊ नये.
८) जोखमीचे, शाररिक कष्टाचे सगळी कामे पुरुषानेच करावे.
९) पुरुषाने स्त्रीला गिफ्ट्स द्यावे.
१०) पुरुषाने, स्त्रीला जे योग्य वाटेल तेच करावे.
११) पुरुषाने, स्त्रीचा आदर करावा. कारण तीचे लिंग "ते" आहे म्हणून.
१२) पत्निने आत्महत्या केली तर ती हुंडाबळी, पतीने आत्मह्त्या केली तर बेजबाबदार, कमजोर, नामर्द पती.
१३) पत्निने पतीला सोडले तर ते योग्य डिशिजन, पतिने सोडले तर अत्याचारी पति.
१४) पत्निने पति चा खुन केला तर स्त्री शक्ति, पतिने खुन केला तर वाढता स्त्री-अत्याचार.
१५) करिअर साठी केलेला गर्भपात आधुनिक प्रगत स्त्री, पुरुषाने (शंतनू) विरोध करु नये, गप्प बसावे.
१६) घरातील छोटे भांडण फक्त स्त्री करते, पुरुष करतो ते कौंटुंबिक (डोमेसटिक) अत्याचार.
१८) प्रणय चा पुरुषाने केलेला नकार म्हणजे "स्त्री अत्याचार". स्त्री ची गरज न भागवणे म्हणून.
१९) पिक्चर फिल्म मध्ये दाखवल्या प्रमाणे, पुरुषाने स्त्रीच्या माघे राहावे, तिचे मन जिंकण्याचा नेहमी प्रयत्न करावे. रोड रोमियो किंव्हा प्रेम विर त्तुम्ही नक्की बनणार.
२०) भांडखोर पत्नी, आर्दश-प्रगत नारी; भांडखोर पति, अत्याचारी पुरुष.
२१) पत्निने ओफिस मध्ये केलेला फोन म्हणजे प्रेमळ,काळजी करणारी पत्नि; पतिने फोन केला तरी संशयी पति.
२२) मुलगी जन्मास आली तर सेलेब्रेट केलेच पाहिजे. हात आखडता घेतला तर स्त्री विरोधी.
२३) स्त्रीने पुरुषाच्या शरिराला स्पर्श करुन उपभोग घेतला तर ते प्रेम, पुरुषाची वाहवा, पुरुषाने स्त्रीला स्पर्श केला तर विनयभंग, बऱ्याच वेळेस बलात्कार सुध्दा.
२४) पुरुषाने, स्त्रीला प्रश्न विचारु नये; स्त्रीने पुरुषाला प्रश्न विचारणे हक्क आहे.
२५) लेडिज फस्ट
२६) स्त्री अबला आहे.
२७) स्त्रीने कुंटुंबाची बारादारी केली तरी चालेल पण तीचे पॅशन पुर्ण करावे ; पुरुषाने कुंटूबाची जबाबदारी पुर्ण करावी त्याचे पॅशन म्हणजे मुर्खपणा आहे.


ह्या आणि अश्या अनेक दबावतंत्रा द्वारे पुरुषाचे खच्चिकरण होत आहे. पुरुषांचे ह्र्दय विकारात , ह्रदय विकाऱ्याच्या झटक्यात मरण्याचे प्रमाण खूप आहे व ते वाढत आहे. पुरुषाचे सरासरी आयुष्य, स्त्री पेक्षा ५-१० वर्षांनी कमी आहे. शहरात तर ते दिवसें दिवस कमी होत आहे.


पुरुषांनी बलिदान देऊन दिल्ली मेट्रो बनवायची पण संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, जेव्हा सर्वांना घराची ओढ असते, कोठेच ज़ागा नसताना, जेव्हा काही पुरुष "स्त्रींसाठी आरक्षित" बोगी चा आधार घेता तर त्याना बेदम मार द्यावा. (पुरुषांसाठी आरक्षित बोगी का नाही?, "स्त्री आरक्षित" बोगी रिकाम्या कश्यासाठी? , "आरक्षित" बोगी कशासाठी?) पुरुषांना कुत्रापेक्षा कनिष्ट समजावे. मुंबई मेट्रोत की पुण्यातील बस सगळी कडे तेच हाल. पुण्यातील जेल...हो जेलमध्ये सुधा आरक्षणाची हीच परिथिती आहे.

http://legalfighter.wordpress.com/2010/12/02/letter-to-delhi-metro-demanding-male-only-coaches/

http://legalfighter.wordpress.com/2011/01/13/beating-men-feasible-safeguarding%E2%80%99em-aint/


आपला सारासार विवेक मेला का ?
किती सहन करऱ्याचे पुरुषांनी ?
किती दिवस गप्प बसयाचे ?

संघटीत होऊन का नाही आवाज बुलंद करऱ्याचा ?

पुरुषांचे खच्चिकरण थांबलेच पाहिजे. ते ही आज पासुनच.



-- सिफ पुणे --

February 5, 2011

स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री-पुरुष कायद्यातील विषमता

स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री-पुरुष कायद्यातील विषमता

===============================
http://www.manogat.com/node/21166
================================


भारत हा मजबूत कुटुंबव्यवस्था आणि विविध प्रकारचे नातेसंबंध यामुळे ओळखला जातो.
तथाकथित पाश्चिमात्त्य संस्कृतीमुळे आधीच काही नातेसंबंधांत दुरावा निर्माण होत आहे.

त्यात वेगवेगळे कायदे करून सरकार किंवा न्यायालय आणखी ते नातेसंबंध बिघडविण्यात हातभार लावत आहे. (स्त्री मुक्तिवादी संघटना जोडीला भांडवलशाही साम्राज्याचा ह्यांचा वाटा मोलाचा आहे.)


***भाग : मुलगा आणि मुलगी या नात्यातल्या "मुलगी" कडून असणारे कायदे: ***


पारंपारीक प्रथेनुसार वडील आपल्या मुलाला शिक्षण देवून मोठे करतात आणि मोठेपणी मुलगा त्यांना (त्यांना संपुर्ण कुटुंबाला) सांभाळतो.
मुलगा मुलगी समानता यामुळे मुलीलाही मुलाच्याच तोडीचे शिक्षण आज पालक देतात.
मुलीचे लग्न करतांना हुंडा मिळूनही मुलगी नोकरी करते आणि तो पगार सासू-सासऱ्यांना ती देते. (वस्तुतः किती जोडपे सासू सासऱ्या बरोबर राहतात ? रोजी-रोटी साठी परगावी किंव्हा शहरात जाणे हे वास्तव आहे.)
किंवा आजकाल त्याला हुंडा न म्हणता आम्ही स्वखुशीने देतो से म्हटले जाते. (नवरा मुलगा मोठा पगारा वाला पाहिजे , त्याकडे गाडी , बंगला किंव्हा फ्ल्याट असावा. याला कोणीत हुंडा का म्हणत नाही ?)
आणि सरकार इकडे कायदा करतं की-सासऱ्याच्या संपत्तीवर सूनेचा हक्क नाही. (जावयाचा तरी कोठे सासरा-सासू चा संपत्तीवर हक्क कोठे आहे ?)
असे कसे काय बुवा?
मग सुनेचा पगार सासू-सासऱ्यांना कसा चालतो? (वस्तुतः , किती जोडपे, सासू सासऱ्या बरोबर राहतात ? घरात मोलकरीण-नोकर म्हणून कोण राहते ?)
तो मग तीने आई-वडीलांना दिला पाहिजे. (बिन भाड्याचं घर का आवडणार नाही ? लोन चा ईमआय कोण भरणार ?)
मुलगा मुलगी समानता आली असे वाटत असतांनाच स्त्रीधार्जिण्या कायद्यांमुळे अमाप फायदा फक्त स्त्रीलाच होतो आहे. ( त्यामुळे त्यांचे फाजील फावते., पैशाचे मोल जाणवत नाही.)
मुलगा मुलगी समानतेच्या मी विरोधात नाही. कुणी नसावं सुद्धा.
पण मग जर समानता आहे, तर विशिष्ट कायदे मात्र स्त्रीयांनाच फायदेशीर का?
मग स्त्रीयांना प्रत्येक ठिकाणी आरक्षण कशाला हवे?
मुलगा-मुलगी दोघांचा जर संपत्तीवर "समान" हक्क आहे तर दोघांनीही आई-वडीलांना सांभाळायला हवे.
मुलीनेसुद्धा वडिलांना सांभाळायला हवे. तसे होत नाही. अस कसे काय?
आणि संपत्ती मध्ये काय काय मोडतं हे कायदा स्पष्ट करेल का?
वडीलांचे पेन्शन ही सुद्धा संपत्ती मानली जाते का?
वडिलांचे रिटायर झाल्यावरचे पैसे ही सुद्ध वडिलांची संपत्ती असते का?
याबाबत कायदा काय सांगतो?
मुळात सरकार अश्या प्रकारचे कायदे जेव्हा करतं तेव्हा घरा घरांत जावून सर्वेक्षण करतं का?
आता मुलीचा सुद्धा वडीलांच्या संपत्तीत अर्धा वाटा असतो असा कायदा आहे.
ती संपत्ती मुलीला मिळाली म्हणजे अर्थातच जावयाला आपोआपच मिळाली. (हे जावयाला दाखवलेले गाजर आहे , वस्तुतः त्याला काही मिळत नाही.)
इकडे सून आणि मुलगा त्या सासू-सासऱ्यांचं सगळ करणार (जे क्रमप्राप्त आणि योग्यच आहे याबद्दल दुमत नाही)
पण सूनेला संपत्तीत वाटा नाही असे कसे काय? (जावयाचा तरी कोठे सासरा-सासू चा संपत्तीवर हक्क, वाटा आहे ? स्वत:चा , पतिचा , वडिलांचा पैसा पुरेसा नाही का? )
मग मुलाचा अपघाती म्रूत्यू झाल्यास सुनेला मग सासऱ्याचा संपत्तीत काहीच मिळणार नाही असे समजायचे का? (किती हाव ठेवणार?)
की त्या सूनेला ते तीच्या माहेरी पाठवून देणार?
आणखी एक कायदा असा आहे की मुलाच्या संपत्तीवर वडीलांचा हक्क आहे.
म्हणजे ती संपत्ती पुन्हा वडीलांकडून "मुलीला" आणि पर्यायाने "जावयाला" जाणार. (हे जावयाला दाखवलेले गाजर आहे , वस्तुतः त्याला काही मिळत नाही.)

सगळा "गो गो गो गोलमाल" आहे.
अस कसे काय?

कुणी यावर एक शक्कल शोधून काढील की जो मुलगा आहे तो कुणाचा न कुणाचा जावई सुद्धा असतोच की.
आणि जी मुलगी आहे ती कुणाची न कुणाची सून आहेच की.
होय हे बरोबर आहेच.
पण, मग अशा वेळेस अश्या कायद्यांमुळे "पैशांनी गरीब" असलेल्या वडिलांच्या मुलीशी कुणी लग्न करणारच नाही!
हे योग्य नाही.

आजकाल म्हणतात की, आजकालची मुलं मोठी झाल्यावर आई- वडीलांना सांभाळत नाहीत.
वृद्धाश्रमात पाठवतात वगैरे.

आता हे जे "आजकालचे मुलं" आहेत ती ज्यांची जावई आहेत ते वृद्ध जोडपे मात्र त्या जावयाचे कौतुक करतात.

"जावयाचे आई-वडील जावयाजवळ राहात नाहीत" याचे कारण ते खालीलप्रमाणे देतात:
"त्या जावयाची पत्नी (म्हणजे मुलगी)चांगली आहे हो, पण तीच्या सासू सासऱ्यांचाच स्वभाव खडूस आहे"
म्हणजे प्रत्येक मुलगा आणि सून एकाचवेळेस चांगले आणि वाईट असतो.
कसे काय?

सगळे सापेक्ष असते.

पण कायद्यांमुळे कुणा एकाच्या पारड्यात गरज नसतांना खुप काही येते आणि ज्याला खरोखरी गरज आहे त्याला काहीही मिळत नाही.


***भाग : लग्न संस्थेतले पती अणी पत्नी या नात्यामध्ये "पत्नी" कडून असलेले कायदे ***

पती-पत्नी च्या नात्यांत ही तसेच.
बहुतेक घटस्फोटासंदर्भातले कायदे हे स्त्री कडूनच आहेत.
जर मुलगा आणि मलगी समान आहेत तर घटस्फोट घेतांना फक्त पतीनेच पत्नीला का पोटगी द्यावी?
पत्नीही जर कमावती असेल तर पोटगीची गरज नाही आणि फक्त पत्नी कमावती असेल तर पत्नीने पतीला पोटगी द्यायला हवी.
पती पत्नी यांच्या एकमेकांतील मानसिक छळ हा प्रकारही तसाच आहे. तो कायदा सुद्धा स्त्री कडूनच (बायकांकडून) आहे.
पत्नी(सून) मानसीक छळ करत असेल तर त्या संदर्भात कायदा का नाही?
मुलगा आणि मुलगी समान आहेत ना!
स्त्री तर उलट मानसिक दॄष्टया जास्त सक्षम असते.
बहुतांश हार्ट एटॅक पुरुषांनाच येतात.
तरीही फक्त पुरुषच स्त्रीचा मानसिक छळ करतो असे कसे?
निदान कायदा तरी असेच सांगतो.
विविध पॉलिसी काढण्यासाठी सुद्धा पुरुषांवर स्त्रीयांकडून दबाव आणला जातो, असे मी मध्यंतरी वाचले होते तसेच आजकाल पॉलिसीच्या जाहिराती सुद्धा अशाच बनत आहेत, जेणेकरून पत्नी व मुले यांच्या दृष्टीकोनातून वडील म्हणजे कर्ता पुरुष हा मरेपर्यंत पैसे कमावणारी न थकणारी आनी मेल्यानंतरही पैसे देणारी एक मशीन आहे. (ह्याला कोणी हुंडा का म्हणत नाही?)



***भाग 3 : लिव्ह ईन रिलेशनशीप मधील पुरुष आणि स्त्री या नात्यामध्ये "स्त्री" कडून असलेले कायदे ***


(लग्नचा खोटारटेपणा लक्षात आल्यावर तरुणांचा त्यातील विश्वास उडून गेला आहे. असे तरुण वेगवेगळे सुख कर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग म्हणून लीव इन रीलेशन संकलपणा पुढे आली, पण तिथे पण लिंगभेदी कायदे घाण करत आहे.)


आता तर यावर कडी म्हणजे लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये मजा दोघेही मारणार आणि सोडून जातांना मुलगा मुलीला पोटगीचे पैसे देईल कारण ती त्याच्या पत्नीच्या दर्जाची आहे?
असे कसे?
मला तरी या सगळ्या कायद्यांत एकवाक्यता दिसत नाही.
सगळा सावळा गोंधळ आहे.
आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर हा सगळा अगम्य प्रकार वाटतो.

आपल्याला काय वाटते?
कुणी जाणकार सांगेल काय?

पुरुषां बद्दलच्या भाकड संकलपणा

पुरुषांची भावनिक कोंडी प्रत्येक क्षणी आपणस अनूभवायास मिळते.


) पुरुष हे महिलां सारखे भावनिक नसतात.
सत्य : वनदेरबिट युनिवरसुटि च्या व इतर अनेक संशोधात्मक अभ्यासात असे आढळून आले आहे कि , पुरुष आणि माहिला समान भावनिक असतात. दुःख आणि सुख चा समान प्रभाव पुरुष आणि महिला वर पडतो. स्त्री हि पुरुष पेक्षा जास्त भावनिक कधीहि नसते. फ़क्त स्त्री ते पटकन व्यक्त करते व गंगा , यमुनाचा आधार घेते. भावना लपवली म्हणजे ती कमी असते असे काही नाही. भावना व्यक्त केली म्हणजे ती जास्त असते असे ही नाही.

) पुरुषांना संवाद आवडत नाही.
सत्य : पुरुष, स्त्रीं पेक्षा वेगळ्या पध्दतिने संवाद साधतात. पुरुष मुद्दे सुत संवाद पसंत करतात.

) पुरुष नेहमी सेक्स बद्दल विचार करत असतो.
सत्य : किन्सये ईन्स्तितुत च्या संशोधात्मक अभ्यासात हा समज मोडित काढला आहे. अपोजिट सेक्स चे आर्कषण हि निर्सग किमया आहे. स्त्री-पुरुष सम प्रमाणात त्याच्या व्यसनी असतात. भावना लपवली म्हणजे ती कमी असते असे काही नाही. भावना व्यक्त केली म्हणजे ती जास्त असते असे ही नाही.

) पुरुषांना मुले नको असतात.
सत्य : सार्वजनिक सर्वेक्षणात सिद्द होते की , जीवनातील मोलिक क्षण कोणता असे विचारले असता , वडिल होण्याचा क्षण , सर्वच पुरुष अभिमानाने सांगतात.

) पुरुषांना स्वयंपाक येत नाही.
सत्य : जगातील बेस्ट शेफ़ कोण आहे. स्त्री कि पुरुष ? वेळोवेळी पुरुषानी दाखऊन दिले आहे. घर काम असो कि जोखमीचे काम पुरुष कोठेही माघे नाही.

) पुरुषांच्या हक्कां विषयी बोलणे हे कमी पणा आहे.
सत्य : जीवनाचा आधिकार पुरुषाला पण आहे. पुरुषाला पुरुष असण्याचा अभिमान असणे काहिही गैर नाही. मुलभुत हक्कांसाथी लढा देणे प्रत्येक प्राणी मात्रचा आधिकार आहे.

) समाज हा पुरुष प्रधान आहे.
सत्य : प्रधान हा लिंग भेद करत नाही म्हणून तो प्रधान असतो. जो भ्रष्ट असतो त्याला समाज गुंड म्हणतो. गुंड प्रधान समाज असता तर गुंड आराम करत घरात टि वी पाहत बसले असते. त्यांना नोकरीसाठी मेहनत न घेता आराम मिळाला असता. लष्कर देशाचे संरक्षण करते म्हणजे देशात लष्करी राजवट आहे असे म्हणायचे का ?

) पुरुषाने घरातील सर्व फ़ाजिल आर्थिक गरजा पुर्ण केल्या पहिजे.
सत्य : थांबा ! पुरुष, हे काही बिना कार्ड वाले ऐतिम मशिन नाही.


-- सिफ़ पुणे --